Loading....

Datta Avadhoot Entertainement and Swarrang Pen – Singing Competition (Karoke Base) 2025

  • 14 Views

हिंदू नववर्षाच्या स्वागतास दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण आयोजित गाण्याची स्पर्धा (कराओके बेस)संपन्न

पेण प्रतिनिधी

हिंदू नववर्षाच्या स्वागतास दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण आयोजित गाण्याची स्पर्धा (कराओके बेस) पेण बोरगाव रोड येथील कौशिकी गार्डन येथे संपन्न झाल्या,या स्पर्धेस श्रोतेवर्गाचा पेण मध्ये उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला तब्बल 68 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन 7 तास गाणी म्हणत स्पर्धेचा उच्चांक गाठला.

दत्त अवधूत एंटरटेनमेंट व स्वररंग पेण, नेहमीच महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कलाकारांचा व कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवेळी विविध उपक्रम राबवित असतो.या मध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा असो,नाटक चित्रपट निर्मिती असो वा, गाण्याच्या स्पर्धा, या व्यासपीठाने आता पर्यंत हजारो कलाकार घडविले आहेत.संस्थेचे निर्माता व अध्यक्ष श्री.कौस्तुभ छाया विलास भिडे हे अशा प्रकारचे उपक्रम राबवित आहेत.

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी या वर्षीही हा उपक्रम राबविण्यात आला.हिंदी मराठी गाण्याच्या तालावर उपस्थित श्रोतेवर्ग मंत्रमुग्ध झाले होते. या स्पर्धेमध्ये अलिबाग, कोल्हापूर,पनवेल, ठाणे,मुंबई, तसेच रायगड जिल्ह्यातून स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षक श्री अविनाश देव, श्री अश्विनी म्हात्रे, श्री. संदीप शहा यांनी केले तसेच निवेदन महेश हेलवाडे यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – अभिषेक देव
द्वितीय क्रमांक -शिवदास नाखवा तृतीय क्रमांक – प्रथमेश गायकवाड उत्तेजनार्थ –
राज पुळेकर यांनी पटकावला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र साळवी , सुनील पाटील, विलास भिडे, छाया भिडे, स्वप्नील साने, किरण देव सुहास तेरवाडकर, हर्षदा भिडे, वैभवी म्हात्रे, लाभेश पाटील, हरेश पाटील,अदिती पाटील, राधिका साने, निरंजन रोडेकर, श्याम जॉर्ज, विजय फाटक, अथर्व फाटक , आकाश मोकल, मयुर जाधव मंदार पाठारे, सायली पोतदार, आरती शिंदे, आदी सर्व जण उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी स्वभारत साज मराठी आणि साप्ताहिक गर्जा रायगड हे मिडिया पार्टनर होते. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक दत्त अवधुत एंटरप्रायझेस होते.

  • Language English
  • Subtitles English
  • Audio Languages English
  • Genre Show
  • Release Date 31 Mar, 2025